पार्थ पवार प्रकरणात फडणवीसांची मोठी कारवाई ; पुणे तहसीलदाराचं निलंबन अन् आणखी एक महत्त्वाचा आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर सरकारी जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या व्यवहारात तब्बल 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून, केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला आहे. व्यवहारानंतर अवघ्या दोन दिवसांत स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या प्रकरणाची फाईल इतक्या वेगाने कशी फिरली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. तसंच याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
पार्थ पवार हे अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीत त्यांचे मामेभाऊ आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. या दोघांनी मिळून ही सरकारी जमीन खरेदी केली आहे. सरकारी नियमांना बगल देऊन ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 25 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला. विशेष म्हणजे, जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या व्यवहाराची फाईल इतक्या वेगाने कशी पुढे सरकली, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, पुण्यातील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात ही 40 एकर सरकारी जमीन आहे. सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला जात असून या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….