निवडणुकीची घोषणा झाली, पण दुबार मतदारांचं काय करणार..? निवडणूक आयोगाने समोर आणला डबल स्टारचा तोडगा..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल अखेर वाजलं आहे. आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची घोषणा केली.
या घोषणेनुसार आता राज्यात एकूण 246 नगपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. यात 15 नव्या नगरपंचायती आहेत. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्याआधी महाविकस आघाडी तसेच मनसेने मतदार याद्यांत घोळ आहे. अनेक मतदार दुबार आहे, असा आरोप करत मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या, अशी मागमी केली होती. विरोधकांच्या याच आक्षेपाला झुगारून आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. सोबतच दुबार मतदारांचा घोळ मिटावा यासाठी एक तोडगा काढला आहे.
मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर मतदारांना त्यांचे नाव शोधता येईल. याशिवाय मतदारांच्या सोईसाठी एक विशेष अॅपही विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधता येईल. सोबतच त्यांच्या मतदान केंद्राचाही शोध घेता येईल. उमेदवार कोण आहे, त्यांच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत याचाही शोध मतदारांना घेता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
काढला डबल स्टारचा तोडगा
तसेच, मतदार याद्यांतील संभाव्य दुबार नावांचीही राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या त्यांच्या सिस्टिमवर एक टूल विकसित केले आहे. याच टूलच्या मदतीने प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य मतदाराच्या नावापुढे डबल स्टार दिसेल, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
नाव, फोटो, पत्ता तपासला जाणार
जिथे-जिथे मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहेत, तिथे तिथे संबंधित अधिकारी प्रभागामध्ये, मतदान केंद्रामध्ये तो मतदार कुठे मतदान करेल याची माहिती घेईल. त्याचे नाव, लिंग, फोटो, पत्ता सर्व बाबी तपासल्या जातील. ज्या मतदान केंद्रामध्ये दुबार मतदाराला मतदान करायचे आहे, त्या मतदान केंद्रावर त्याला मतदान करायची सोय असेल. अन्य मतदान केंद्रावर त्या मतदाराला मतदान करता येणार नाही.
मतदाराकडून लिहून घेतले जाणार प्रतिज्ञापत्र
ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार आलेले आहे आणि त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही तर सर्व मतदान केंद्रांवर त्याच्या नावापुढे डबल स्टार दाखवले जाईल. असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. मी या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रावर मतदान केलेले नाही, तसेच अन्य मतदान केंद्रावरही मतदान करणार नाही असे मतदाराकडून लिहून घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….