मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रातील बोगस आणि दुबार मतदारांच्या प्रश्नावर आता महाविकास आघाडी, मनसे आणि सहयोगी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई तसेच अरविंद सावंत यांनी आज (3 नोव्हेंबर) निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनातून मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी केली आहे. अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, तसेच मनसे आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांसह ज्ञानेश कुमार यांच्या इतर आयुक्तांना भेटणार आहे.
व्हीव्हीपॅटचा समावेश गरजेचा
अनिल देसाई म्हणाले की, प्रत्येक मतदाराला पारदर्शकतेचा विश्वास देण्यासाठी व्हीव्हीपॅटचा समावेश गरजेचा आहे. निवडणूक आयोगाने ज्या सुधारणा जाहीर केल्या त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का? असे ते म्हणाले. 1 जुलैची कट-ऑफ डेट निश्चित करून आयोगाने लाखो नव्या मतदारांना वगळले. ‘1 जुलैनंतर 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांचा काय दोष?’ असा सवाल देसाई यांनी केला. आयोगाने जर 15 ऑक्टोबरपर्यंत पात्र मतदारांचा समावेश मान्य केला असेल, तर सुधारित यादी तयार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
लोकशाहीचं रक्षण हे आयोगाचं कर्तव्य
अनिल देसाई म्हणाले, ‘भारत निवडणूक आयोगावर लोकशाहीची जबाबदारी आहे. पारदर्शक आणि निर्दोष निवडणुका घेणं हेच आयोगाचं कर्तव्य आहे. आम्ही न्याय्य मागणी करतोय.’ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जर आयोगाने या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर न्यायालयात जाण्याचे पर्याय खुले ठेवले जातील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….