‘पुढील १० वर्षांचा’ पगार निश्चित होणार..? कॅबिनेटची मंजुरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “केंद्र सरकारने ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ ला मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
५० लाख कर्मचारी, ६९ लाख पेन्शनधारकांना लाभ
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर, संरक्षण सेवांमधील कर्मचाऱ्यांसह सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, वेतन आयोगाकडून पगारासंदर्भात शिफारशी केल्यानंतर, त्या केंद्र सरकारकडून मान्य होतील, तेव्हा त्या लागू होतील. सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलैपासून लागू) महागाई भत्ता वाढवून दिला जातो. आठवा वेतन आयोग लागू होत असताना महागाई भत्त्याची प्रक्रिया कशी असेल, याकडे आता कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे. जानेवारीतील नवी दिल्ली निवडणुकीपूर्वीच केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती.
केंद्र सरकारने ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट फायदा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ ला मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….