“शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र यामध्ये युतीमध्ये लढत द्यायची की स्वबळावर लढायचे याची चाचपणी अद्याप सुरु आहे.
यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतंर्गत चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शाह हे मुंबईमध्ये भाडप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाला राजकीय सूर जास्त होते. यामध्ये अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. अमित शाह महाराष्ट्रामध्ये भाजप कोणत्याही कुबड्याशिवाय असल्याचे वक्तव्य केले. यांच्यावर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार खासदार राऊत यांनी घेतला. ते म्हणाले की, “हिंदुस्तानामध्ये अनेक ठिकाणी भाजप कुबड्यांवर सत्तेत आली. कुबड्यांच्या मदतीवर त्यांनी पक्ष वाढवला, आज बिहारमध्ये कुबड्या नाहीयेत का? महाराष्ट्रामध्ये दोन कुबड्या नाही का? कुबड्या घ्यायच्या वापरायच्या आणि फेकून द्यायच्या ही भाजपची नीती राहिली आहे,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, “भाजपला मराठी माणसांची शिवसेना फोडायची होती. त्यांचे काम झाल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही. महाराष्ट्रात भाजपला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. त्यांना कोण ओळखत नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिले भाजपासाठी काम केले पाहिजे. बाबरी नंतर आम्ही देशभरात लोकसभा लढवणार होती. अटल यांनी विनंती केली तुम्ही निवडणुका लढवली तर भाजपची नुकसान होईल. आम्ही करताना करतो तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बाळासाहेब यांनी एका क्षणात मागे घेतले उमेदवार,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सत्तेमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह स्पष्ट बोले आहे. शिंदे आणि अजित पवार यांनी बाहेर पडावे. यांना स्वाभिमान असेल तर बाहेर पडावे. . एकनाथ शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर पडावं अमित शाह यांना दुर्बिण तयार करावी लागेल. राजकारणात चढ उतार होत असतात. अमित शाह म्हणजे सर्वेसर्वा नाही आहे. या देशात लोकशाही राहील. विरोधी पक्ष आहे म्हणून लोकांचा आवाज पोहोचतोय. इथे हे लोकशाही संपवायला निघाले आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
भाजपमध्ये परिवारवाद नसल्याचे देखील अमित शाह मुंबईमध्ये म्हणाले. यावर संजय राऊत म्हणाले की, “अमित शाह नंतर आले आहेत. व्यापार म्हणून ते आले. मुलाला क्रिकेटमध्ये टाकून राजकारण करायचे. कर्तृत्व शून्य मुलाला बसवायचे याला परिवारवाद म्हणतात,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….