ऐनवेळी मतदार यादी रखडली..! जिल्हा परिषद मतदार यादी आता ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणानुसार मतदान केंद्रनिहाय मतदार यादी सोमवारी (दि. २७) प्रसिद्ध होणार होती. मात्र, संगणक प्रणालीचे तांत्रिक कारण देत ही मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम लांबणीवर टाकला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन वेळापत्रकानुसार ही अंतिम मतदार यादी दि.१२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.जिल्हा परिषद आणि १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या.
त्यावर दि. १ ते १४ ऑक्टोबरदरम्यान संबंधित तहसील कार्यालयात सूचना आणि हरकती नोंदविण्याची संधी दिली. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी गट-गणनिहाय अंतिम मतदार याद्या प्रकाशित करणे अपेक्षित होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करणे पुढे ढकलले आहे.
या याद्या १२ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असल्या तरीही मतदार, नागरिक आणि राजकीय पक्षांना ३ नोव्हेंबरपासून मतदार याद्या माहितीसाठी उपलब्ध होतील.मतदार यादीमधील चुकांसंदर्भात राज्यातील महाविकास आघाडीतील घटकपक्षांसह मनसे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढणार आहे. यामुळे मतदार यादी प्रसिद्ध करणे लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….