शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, नेमकं कारण काय..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसापासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले.
यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. पण नेमके शरद पवार आणि अजित पवार एकत्र का आले? तर आज बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एका खुर्चीचे अंतर होते. यावेली अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.
विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शरद पवार आणिअजित पवार एकत्र
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मधील व्हीआयटीमध्ये ही सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार ,विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार,खजिनदार म्हणून युगेंद्र पवार ही या ठिकाणी उपस्थित आहेत .काही वेळात ही वार्षिक सभा विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या सभागृहामध्ये ही सभा पार पडत आहे. या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक देखील झाली आहे.
गेल्या चार दिवसाखालीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहिलेहोते. या बैठकीत साखर कारखान्यांच्या समस्या आणि साखर उद्योगासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….