विषारी कफ सिरपचा वाढता विळखा, यवतमाळच्या कळंबमध्ये 6 वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू ; अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणाले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मध्य प्रदेशात चिमुकल्या लेकरांचे मृत्यूकांड घडवण्यासाठी जबाबदार असलेल्या विषारी कफ सिरपमुळे साद्याप देशभरात चिमुकल्यांचे मृत्यू तांडव सुरु असल्याचे चित्र आहे.
अशातच यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील शिवम सागर गुरनुले या 6 वर्षीय बालकाचा देखील खोकल्याचे औषध घेतल्यानंतर मृत्यू झालाय. शिवमवरएका खासगी रुग्णालयात उपचार सुरुहोते. यावेळी अचानक प्रकृती बिघडली असतात्याला शासकीय रुग्णालयात रेफर केलं. मात्रयावेळीउपचारदरम्यानत्याचा मृत्यू झालाआहे. अन्न व औषध विभागाकडून मेडिकलमधून पाच औषधाचे नमुने सध्याघेण्यातआलेअसूनआता अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवालाअंतीयातीलमृत्यूचेकारणकळूशकणारआहे.
यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील 6 वर्षीय शिवम या बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्यानंतर मृत्यू झाला. त्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी माहिती देताना सांगितले की, वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून बुधवारी एक पत्र प्राप्त झाले. जिल्हा रुग्णालय बालकाला मृताअवस्थेत आणण्यात आले होते. याची चौकशी केली असता, दोन चार दिवसांपूर्वी त्याला काही सर्दी खोखल्याची औषधी देण्यात आली होती. त्या सात औषधांची यादी प्राप्त झाली होती. त्याची नमुने घेतले आणिते तपासनीसाठी पाठविलेआहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या औषधाचे वापर व वितरण थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहे. तपासणीचा अहवाल अद्याप यायचा असून अहवाल आल्यानंतर यातील सत्याताकळूशकेल. अशीमाहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनीदिली.
औषधी सुरू असताना अचानक तो बेशुद्ध झाला, अन्….
शिवमला सर्दी खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला यवतमाळच्या खाजगी रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी काही औषधी लिहून दिल्या. औषधी घेतल्यावरही त्रास कमी न झाल्यामुळे दोन दिवसांनी परत डॉक्टरांना दाखविले. त्यांनी पुन्हा औषधी दिल्या. या औषधी सुरू असताना अचानक तो बेशुद्ध झाला. खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. औषधांमुळे शिवमचा मृत्यू झाल्या असावा, अशी शंका आहे. परंतु सविच्छेदन अहवाल आणि औषधांचा अहवाल आल्यावरच नेमका काय प्रकार झाला, हे कळेल असे शिवमच्या कुटुंबीयांनी सांगितले.
बाहेरच्या राज्यातून भेसळ, केंद्र सरकारला माहिती देऊ
कफ सिरफ आपल्या इथे तयार झाले नाही. कळंब तालुक्यातील घटनेबाबत अद्याप माझ्याकडे अहवाल आलेला नाही. त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये कोणी दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तातडीने या कफ सिरफ वर बॅन करण्यात येईल. विक्रेत्यांना देखील डॉक्टर रिपोर्ट शिवाय औषध देऊ नये, असे सांगण्यात येईल. बाहेरच्या राज्यातून भेसळ होते. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला देखील याबाबत माहिती देऊ, अशीमाहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीदिली.