डिजे व बैंण्ड चा खर्च टाळून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व व आरोग्य शिबिर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील जय अंबे दुर्गा उत्सव मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रमावर भर देते या मंडळाची स्थापना 53 वर्ष आधी 1972 ला झाली.असून यावर्षी डीजे मुक्त मिरवणुकीला समर्थन देत मंडळाचे अध्यक्ष गौरव गाढवे यांनी आपल्या मंडळाने यंदा गोर गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दृष्टीने पालकत्व स्वीकारले असल्याचे जाहीर केले. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने व शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण आपण बघतो परंतु फुल ना फुलाची पाकळी म्हणून पालकाचे छात्र नसलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणुन वर्ष भरात विविध आरोग्य शिबीर मंडळाच्या वतीने आयोजित केले जाणार आहेत. या कौतुकास्पद निर्णयाने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.