पुसद की महाराणी व नवल बाबा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटाच्या महिलांचा सत्कार सोहळा संपन्न….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील पुसद की महाराणी मंडल व नवल बाबा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील नगरपरिषद हद्दीतील महिला बचत गट यांच्या कार्य कौशल्याची दखल घेऊन मंडळाचे आधारस्तंभ नटवर जी उंटवाल यांचे नेतृत्व सत्कार सोहळ्याचे आयोजन शहरातील नवल बाबा वाढ पुसद येथे उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा पुसद जिल्हा अध्यक्ष डॉ आरती फुफाटे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हे वार भारतीय जनता पार्टी व शहराध्यक्ष निलेश पेंशनवार पुसद न. प चे विरोधी पक्ष नेते नेते निखिल चिद्दरवार माजी नगरसेविका सौ रूपाली जयस्वाल शिवसेना नेते एडवोकेट उमाकांत पापीनवार भीमशक्ती अध्यक्ष संतोष अंभोरे लहुजी शक्तीचे अध्यक्ष भारत खंदारे सौ शोभा सरकटे नंदकुमार उबाळे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप रायपूरकर यांनी केले कार्यक्रमाला महिला बचत गट यांच्या निर्माण झालेल्या अडचणी बाबत व शोभा सरकटे यांनी आपल्या भाषणातून मुद्दे मांडले. त्यांना निर्माण झालेल्या अडचणीवर सर्व परी मदत करण्याचे आश्वासन शिवसेना नेते एडवोकेट उमाकांत पापीनवार. पुसद जिल्ह्य भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सौ. आरती फुफाटे यांनी दिले लवकरच महिला बचत गट यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन सर्व महिला बचत गटातील महिलांना विश्वासात घेऊन केले जाईल अशी त्यांनी उपस्थित जनसमुदायसमोर ग्वाही दिली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिला बचत गट अध्यक्ष व सचिवांचे मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व वृक्ष वाटप करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार मंडळाचे आधारस्तंभ श्री नटवर उंटवाल यांनी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम विवेक डंगोरिया. अध्यक्ष विजय पवार दिलीप नकवाल बाळासाहेब खंदारे यादव हाटे अब्दुल रहमान चव्हाण रितिक डंगोरिया वीर भारवड निखिल डंगऱ्या उदय डंगोरिया मयूर उंटवाल लकी दंगोरिया यश पवार गोलू उंटवाल शुभम डंगोरिया जय उंटवाल रमेश सोमानी राज डागर मुकेश श्रीनाथ. यांनी घेतले कार्यक्रमाला परिसरातील असंख्य नागरिकासह विविध बचत गटांची महिलांची विशेषता मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे विशेष मंडळ कार्यकारणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शहरात सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण करीत आहेत हे विशेष…