सीटू संलग्न बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन माहूर येथे संपन्न ; नुतन जिल्हा कमिटीची निवड ; अध्यक्षपदी कॉ.अगीरकर तर सचिवपदी कॉ.गायकवाड…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- सीटू संलग्न इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अधिवेशन २४ सप्टेंबर रोजी माहूर येथील जगदंबा धर्मशाळा सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या अधिवेशनादरम्यान बांधकाम कामगार संघटनेची नूतन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून,अध्यक्षपदी कॉ. दिगांबर अगीरकर तर सचिव पदी कॉ. गंगाधर गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
अधिवेशनास बांधकाम कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष ऍड.कॉ.एम.एच. शेख आणि जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभने यांची प्रमुख उपस्थिती होती.किसान सभेचे नेते कॉ. अर्जुन आडे, शेतकरी नेते कॉ. शंकर सिडाम, कॉ. किशोर पवार,सीटू राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,सीटू राज्य कमिटी कॉ.करवंदा गायकवाड, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी राज्य अध्यक्ष कॉ. ऍड. एम. एच. शेख आणि कॉ. विजय गाभने यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तर भ्रातृभावी संघटनेच्या नेत्यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.या अधिवेशनादरम्यान बांधकाम कामगार संघटनेची नूतन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून,अध्यक्षपदी कॉ. दिगांबर अगीरकर तर सचिव पदी कॉ. गंगाधर गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी कॉ. किशोर पवार, कॉ.दिगंबर काळे,सहसचिव कॉ.जनार्धन काळे आणि कोष्याध्यक्ष पदी कॉ.अंकुश माचेवाड यांची निवड करण्यात आली. तर सदस्य पदी अनिल राठोड, गांगजी मेश्राम, बंडू वंजारे, मनोज बोईनर, साहेबराव दहिभाते, शेख चांद यांची निवड करण्यात आली तर इतर जागा रिक्त ठेवण्यात आल्या.
एकूण २१ जणांची जिल्हा कमिटी स्थापन करण्यात आली असून, पुढील काळात बांधकाम कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असून, यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगारांनी संघटनेचे सभासद होण्याचे आवाहन सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.