राज्यात अतिवृष्टीचा कहर, पुढील ५ दिवस पाऊस धुमाकूळ घालणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असून पूरस्थिती तीव्र होण्याची शक्यता.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेती, गावे आणि नद्या पाण्याखाली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २४ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार.
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेती आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मात्र मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून धुव्वाधार पावसाचा मुक्काम अजून वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात २८ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण बंगालच्या उपसागरामध्ये २४ सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात सगळीकडे जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाववसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बीड धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणांचे विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत २५ सप्टेंबरपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यभर दिसून येईल. या कालवधीत अनेक जिल्ह्यांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल.
प्र.१: महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कसे राहणार?
उ. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वारे होण्याची शक्यता आहे.
प्र.२: सर्वाधिक पावसाचा फटका कोणत्या भागांना बसणार आहे?
उ. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांत अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
प्र.३: पावसामुळे कोणते नुकसान झाले आहे?
उ. शेती पाण्याखाली गेली आहे, गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे व अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
प्र.४: पावसामागील कारण काय आहे?
उ. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे.
प्र.५: हा पाऊस किती दिवस सुरू राहणार?
उ. २८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.