जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी व गणेशोत्सव निमित्त शहरात मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यात यावे :- शेख अहेमद यांची मागणी……

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- “सध्या कळमनुरी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरचे लाईट बंद झाल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या गोष्टींमुळ कळमनुरी शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कचऱ्याच्या ढिगामुळ शहरात नागरिकांच आरोग्य धोक्यात आले आह तसेच अंधारामुळे चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या सुरु असलेल्या गणेशात्सव व येत्या 10 तारखेला येणाऱ्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य त्या सोयीसुविधा मिळाव्यात व त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नगर परिषदच्या वतीने शहरात कचऱ्याची साफसफाई करणे व ठिकठिकाणी विजेच्या पोलवर लाईटस लावणे गरजेचे आहे.
तसेच शहरात सुरु असलेल्या सणासुदीच्या काळात नगर परिषदेने पाणी पुरवठा करण्याकडेही लक्ष द्यावे जेणे करुन नागरिकांना पाण्यासाठी भर पावसाळयात अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये.
तरी साहेबांनी जनतेच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरव्याव्यात अश्या मांगणी शेख अहेमद यांना केली आहे…