मराठा आरक्षणासाठीचा जीआर हाकेंनी फाडला, पुण्यात मौन आंदोलन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “मराठा आरक्षणाचा शासन निर्णय काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेलं उपोषण सोडलं आहे. मात्र, या आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी आक्रमक झाले आहेत.
ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके देखील नाराज आहेत.
पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी मौन आंदोलन सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी हाके यांनी शासन निर्णय फाडला.
तत्पूर्वी, मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आणि काढलेल्या जीआरमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या जीआरची ओबीसी बांधवांनी होळी करावी, असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलं आहे. तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारच्या निर्णयाचा विरोध करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.