यवतमाळ आगार येथील स्नॅकबार प्रकरण उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- काही दिवसापूर्वी यवतमाळ आगार येथे स्नॅकबार करिता जाहिरात द्वारे दोन लिफाफ पद्धतीने निविदा मांगविण्यात आले होते सदर निविदा मध्ये एकूण ८ निविदा धारकानी निविदा दाखल केले होते ८ पैकी ४ निविदाधारकांना बाद करण्यात आले या पैकी एक फ़ूड वर्ल्ड रेस्टोरेंट यवतमाळ यांनी उद्योग ऊर्जा वा कामगार विभागचे शासन निर्णय १ डिसेंबर २०१६ चे परिशिष्ट ८ प्रमाणे तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परिपत्रक २०२३ नुसार अनामत रक्कम भरणायतून सूट मागितली होती
पण राजकीय हस्तक्षेप व दबावा मुळे विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी फ़ूड वर्ल्ड रेस्टोरेंट यवतमाळ याना जाणून बुजून शासन निर्णय ला केचरीची टोपली दाखून बाद केले याला फ़ूड वर्ल्ड रेस्टोरेंट चे संचालक मोहम्मद आसिम अली यांनी मा. बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली या प्रकरणात २/०९/२५ रोजी सुनावणी घेऊन न्यायालयाने निर्णय घेतला आहे सदर आदेशात असे म्हटले आहे “हे स्पष्ट करण्यात येते की निविदेची पुढील प्रक्रिया या याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल.” वा पुढील सुनावणी १६/०९/२५ रोजी होणार आहे याचिकाकर्ता वतीने एडवोकेट सय्यद ओवेस अहमद यांनी युक्तिवाद केला..