प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; डॉ. मोहम्मद नदीम यांच्या मार्गदर्शनात पुसद काँग्रेस कमेटीचे वतीने विविध कार्यक्रम सम्पन्न….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ,पुसद शहरातील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात केक कापून तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सुमारे १५० ते २०० रुग्णांना अन्नदान, फळ वाटपाच कार्यक्रम घेण्यात आला.
आजारी रुग्णांच्या चेहऱ्यावर क्षणभर का होईना हास्य आणि समाधान दिसले, हा खरा जन्मदिवसाचा आनंद असल्याची भावना या उपक्रमातून सर्वांना अनुभवायला मिळाली.सदर उपक्रम प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्या मार्गदर्शनात तर प्रमुख उपस्थित जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष झिया शेख, तहेसीन खान, विठ्ठलराव दुपारते, सय्यद जानी, संजय कन्हेड, शेख शहाबोद्दीन, माहेफुज अहेमद, ,माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव,आंनता चतुर, मधुकर चव्हाण, अरुण नागूळकर, दिगम्बर देशमुख कान्हेकर, वसंतराव जाधव औदुंबर वृक्ष सेवा समिती,विधानसभा युवक काँग्रेस डॉ. मोहसीन खान, धनंजय आघाम, दीपक घाडगे तसेच सहकारी मित्र व रुग्णसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा समाजहिताचा उपक्रम जन्मदिवसाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरवणारा ठरला.