सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध; गावकऱ्यांनी आमदार वानखेडे यांना धरले धारेवर..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- “तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांची पिके मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन नदिकाठावरील पाण्यात गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सोमवार, १८ ऑगस्ट रोजी आमदार किसनराव वानखेडे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील मतखंड परिसरात गेले असता त्यांना प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधाचा सामना करावा लागला.
या परिसरातील सावळेश्वर चातारी सिंदगी, बोरी, व माणकेश्वर यासह पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदारांनी सहस्त्रकुंड प्रकल्पाला मान्यता देऊन तातडीने काम सुरू त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या विदर्भआणि मराठवाड्यातील सुमारे करण्याची मागणी केली होती. ५० गावांमध्ये असंतोष आहे. या विषयावर आठ दिवसांपूर्वी मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथे विदर्भ मराठवाड्याची संयुक्त सभाही झाली. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील सात हजारावर महिला पुरुष सभेला उपस्थित होते. येथे सहस्त्रकुंड प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविण्यात आला. रविवारच्या पुरात सावळेश्वर गावचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार वानखेडे सावळेश्वर गावात गेले असता गावकऱ्यांनी सहस्त्रकुंड प्रकल्प संदर्भात काय मागणी केली अशी विचारणा करीत घेराव घातला. दोन तास पाऊस आला तर अशी परिस्थिती उद्भवली. तुम्ही कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या आदेशाने धरणाची मागणी केली? अशी विचारणा करीत, आम्हाला धरण नको आहे, असे सुनावले. तसेच ‘जान देंगे मगर जमीन नहीं देंगे’ अशा घोषणा दिल्या. यावर सर्वांचा विरोध असेल तर मी तुमच्यासोबत आहे, असे आमदार वानखेडे यांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.