सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या, तेव्हाही मतदार यादीत नाव ; भाजप नेत्यानं पुरावा दाखवला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. यानंतर आता भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स पोस्ट करत राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मालवीय यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनिया गांधी भारतीय नागरिक नसतानाही त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. त्या आधी मतदार झाल्या आणि मग भारतीय नागरिक, असा आरोप मालवीय यांनी केला आहे.
अमित मालवीय यांनी एक्सवर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. ‘हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याच्या स्पष्ट उल्लंघनाचं उदाहरण आहे. त्यामुळेच राहुल गांधी अशा मतदारांना वैध ठरवण्याच्या बाजूनं असतात. जे अयोग्य आणि अवैध आहेत तेच स्पेशल इंटेंसिव्ह रिवीजनला (SIR) विरोध करत आहेत,’ असं भाजप नेते मालवीय यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘सोनिया गांधी यांचं नाव १९८० मध्ये मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं. त्यावेळी त्या इटलीच्या नागरिक होत्या. तेव्हा त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नव्हतं. त्यावेळी गांधी कुटुंब १, सफदरजंग रोड, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी वास्तव्यास होतं,’ असा दावा मालवीय यांनी पोस्टमध्ये केला आहे.
‘त्यावेळी पंतप्रधानांच्या अधिकृत पत्त्यावर मतदार म्हणून इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मेनका गांधी यांची नावं होती. पण १९८० मध्ये नवी दिल्लीच्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचं पुनरीक्षण झालं. त्यात १ जानेवारी १९८० ही पात्रता तारीख निश्चित केली गेली आणि सोनिया गांधी यांचं नाव पोलिंग स्टेशन १४५ मध्ये क्रम संख्या ३८८ वर जोडण्यात आलं,’ असा मालवीय यांचा आरोप आहे.
१९८२ मध्ये वाद झाल्यानंतर सोनिया गांधी यांचं नाव हटवण्यात आलं. पण १९८३ मध्ये पुन्हा त्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं. त्यावेळी पोलिंग स्टेशन १४० मध्ये क्रम संख्या २३६ वर त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली, असा दावा मालवीय यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….