‘सबके बॉस तो हम हैं’, राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याच्या घोषणेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता म्हटले आहे की, ‘सर्वांचे बॉस’ भारताच्या विकासाला स्वीकारू शकलेले नाहीत. राजनाथ सिंह यांनी टॅरिफवर जोरदार टीका करत असा दावा केला आहे की, कोणतीही जागतिक शक्ती भारताला महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.
काय म्हणाले संरक्षणमंत्री?
ते म्हणाले की, “काही लोकांना भारताची प्रगती स्वीकारता येत नाहीये. ते याला चांगल्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यांना वाटत आहे की, ‘सर्वांचे बॉस तर आम्ही आहोत’, मग भारत इतक्या वेगाने कसा पुढे जातोय? आता भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांची दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करताना, ते आणखी महाग करण्याचा त्यांचा कोशिश आहे. पण ज्या गतीने भारत प्रगती करत आहे, मी तुम्हाला विश्वास देतो की कोणतीही जागतिक शक्ती आम्हाला महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.”
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, “काही लोक असा प्रयत्न करत आहेत की, जेव्हा भारतात तयार झालेली वस्तू दुसऱ्या देशांमध्ये जाईल, तेव्हा ती तेथील वस्तूं पेक्षा महाग होईल आणि लोक ती विकत घेणार नाहीत. असा प्रयत्न सुरू आहे. भारत ज्या वेगाने पुढे जात आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की, आपण लवकरच महाशक्ती बनणार आहोत.”