पाकची 5 जेट्स जमीनदोस्त, S-400 गेमचेंजर; ऑपरेशन सिंदूरवर हवाई दल प्रमुखांचं मोठं वक्तव्य….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू :- “भारतीय हवाई दलाने शनिवारी सकाळी पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानचे 5 जेट्स आणि एक एअरबोन विमान हाणून पाडले आहेत. हवाई दलाचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी या वृत्ताची पुष्टी दिली आहे.
यावरुन दिसते की भारताची दहशतवादविरोधी मोहिम अद्याप सुरुच आहे.
सीमेपलीकडील दहशतवादाला भारतीय सेना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. यातच आज हा मोठा हल्ला हाणून पाडला आहे. याबाबतची आधी माहिती देणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणजे हवाई दलाचे प्रमुख आहेत. बंगळूरु येथे एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे मेमोरियल लेकरामध्ये बोलताना अमर सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
एपी सिंह म्हणाले की, ‘आम्ही पाच जेट पाडल्याची पुष्टी केली आहे आणि एक मोठे विमान देखील आम्ही पाडले, जे एकतर ELINT विमान किंवा AEW&C विमान असू शकते, जे सुमारे 300 किलोमीटर अंतरावरुन लक्ष्य केले गेले. प्रत्यक्षात हे आतापर्यंतचे जमिनीवरून हवेत मारले जाणारे सर्वात मोठे लक्ष्य आहे, हा मोठा रेकॉर्ड ठरत आहेत.’
एपी सिंह यांनी म्हटले की, या ऑपरेशनच्या यशाचं कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. एक एयरबोर्न अर्ली वॉर्निंग एंड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस (AEW&C/ELINT) विमानाला 300 किलोमीटरच्या अंतरावर नष्ट करण्यात आले.तर त्यांनी असेही नमूद केले की, जेकबाबाद मध्ये उभे असलेले काही F-16 विमान आणि भोलारी एयर बेस वर एक AEW&C या विमानांना गोपनीय माहितीच्या आधारावर हाणून पाडण्यात आले आहे.
यावेळी एपी सिंह यांनी असेही अधोरेखित केले की, यशाचं मुख्य कारण राजकीय इच्छाशक्ती होती. आम्हाला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. प्रत्युत्तराच्या कारवाईसाठी आमच्यावर कोणतेही निर्बंध लादले नव्हते. काही अडचणी असल्या, तरी त्या आम्हीच निर्माण केल्या होत्या. किती वाढ करायची हे आम्ही ठरवलं. आम्हाला नियोजन आणि अंमलबजावणीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. आम्ही विचारपूर्वक हल्ले केले.