पुसद मध्ये पावसामुळे भिंत कोसळून चप्पलच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सततच्या मुसळधार पावसामुळे कपड लाईन, देवी वॉर्ड येथे असलेल्या मॅजिक शूज या दुकानाच्या गोदामाची भिंत काल पहाटे कोसळली. या घटनेत मोठ्या प्रमाणात चप्पलांचा साठा खाली पडून खराब झाला.
दुकानाचे मालक श्री. रिजवान अहमद रमजान अहमद यांनी सांगितले की, “सकाळी दुकानात आल्यावर पाहिले तर भिंत आधीच कोसळलेली होती आणि सगळा माल खाली पडून ओला झाला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.”
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसाचे पाणी सतत भिंतीत झिरपल्यामुळे भिंत कमजोर होऊन कोसळली असावी. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.