मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत.
त्यांनी पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरे बंधुंना पुन्हा एकत्र बघण्याची संधी जनतेला मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर एकाच मंचावर येताना पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मातोश्रीवर आनंदाचे वातावरण आहे. २०१२ नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. अशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा होणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.