JEE main आणि NEET च्या परीक्षा वेळापत्रका नुसार होणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
देशभरातील अत्यंत महत्त्वाच्या अशा JEE Main आणि NEET या दोन्ही परिक्षा आता वेळपत्रकारनुसार होणार आहेत. या दोन्ही परिक्षा ठरलेल्या वेळीच घेण्यात याव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यानुसार JEE Main 1 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान तर NEET ची परिक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
सध्या देशभरात कोरोना व्हायरसचं संकट आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येतोय. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत JEE Main आणि NEET या परिक्षा रद्द कराव्यात अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावत परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांनी याचिकाकर्त्यांना सांगितलं की, ‘कोरोनाच्या काळातंही आपण योग्य त्या उपाययोजना आखत पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण परिक्षा रद्द करायच्या का? जर परिक्षा घेतल्या नाही तर विद्यार्थ्यांचं एक वर्ष फुकट जाईल. त्यामुळे खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना करत परिक्षा घ्याव्यात.’
वैद्यकीय प्रवेशासाठी NEET तर JEE Main ही अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी केंद्र पातळीवर घेण्यात येणारी परिक्षा आहे. यूजीसीद्वारे घेतल्या जाणाऱ्या परिक्षा रद्द कराव्या अशी मागणी 11 विद्यार्थ्यांनी केली होती. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.


सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….