Breaking – यूपी सरकारमधील मंत्री व माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचे निधन झाले आहे. मंत्री आणि हिंदुस्थानी क्रिकेट संघातील माजी खेळाडू चेतन चौहान यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते 73 वर्षांचे होते.
किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
चेतन चौहान यांची जुलै महिन्यात कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.