थोडं वाचतं चला; भाषावादात ब्रिजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोटं….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “हिंदी आणि मराठी भाषा वादावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी थेट राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोट ठेवत आव्हान दिले आहे.
शिवाजी महाराजांच्या सुटकेटा संदर्भ देत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना (Raj Thacketay) वाचण्याचा आणि लिहिण्याचा सल्ला दिला आहे. सिंह यांच्या या सल्ल्यानंतर आता मनसेकडून भाजप नेत्याला कोणत्या भाषेत प्रतिउत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाकरे महाराष्ट्रातले नाही, मगधहून आले अन्…, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा हल्लाबोल
नेमकं काय म्हणाले ब्रिजभूषण सिंह?
राज ठाकरे बहुदा लिहित किंवा वाचत नाहीत. त्यामुळे त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी थोडे वाचले पाहिजे. राजकारण करा पण भाषा, समुदाय, जात आणि धर्माच्या आधारावर करू नका असे सिंह म्हणाले.
शिवाजी महाराजांचा दिला संदर्भ
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतीयांमधील संबंध तुटणार नाहीत असे म्हणत, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले तेव्हा आमच्या आग्र्यातील व्यापाऱ्यांनी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यासाठी काम केल्याची आठवणही ब्रिजभूषण सिंह यांनी यावेळी करून दिली.
…तर ते तुम्हाला सहन होणार नाही
जेव्हा राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याचे निश्चित केले होते, त्यावेळी मी ठाकरेंना युपीमध्ये पाय ठेवू देणार नाही असे आव्हान दिले होते. त्यानंतरही त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, उत्तर भारतातील तरुण इतके संतप्त आहेत की, जर कुणी राज ठाकरेंना भेटण्यासाठी फोन केला तर, ते त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे ठाकरेंनी राजकारण जरूर करावे पण, भाषा, पंथ, जात आणि धर्माच्या आधारावर करू नये असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.