विधानसभा निवडणुकीत अचानक ७६ लाख मते कशी वाढली? सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? आंबेडकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यानंतर ७६ लाख मते वाढल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेससहित अनेक पक्षांनी सातत्याने निवडणूक आयोगाला सवाल केला जात आहे.
याच प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. अहिरे यांच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. सुनावणी पार पडल्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत सुनावणी आज सोमवारी पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या चेतन अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य आणि इतर या प्रकरणात आज सुनावणी झाली. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतलं. त्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
कोर्टातील युक्तिवादावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. त्यांनी याआधी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षांना १६ जानेवारी २०२५ रोजी पत्र लिहून ईव्हीएम वापर आणि १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या संशोधना विरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते. परंतु, कोणत्याही राजकीय पक्षाने त्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात हे प्रकरण घेऊन गेले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असेही नमूद केले होते की, ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त ‘चूक’ नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. याचिकाकर्ता चेतन अहिरे यांचा आरोप आहे की, मतदान संपल्यानंतर अचानक ७६ लाख मतांची नोंद झाली. जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही’.