महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात त्यांना शपथ दिली.
माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे काल, १३ मे २०२५ रोजी निवृत्त झाले. न्यायमूर्ती गवई आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
न्यायमूर्ती गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. ते सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत आर. एस. गवई यांचे पुत्र आहेत. त्यांनी आपल्या कायदेशीर कारकिर्दीला १६ मार्च १९८५ रोजी बार कौन्सिलमध्ये नोंदणी करून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी माजी महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत १९८७ पर्यंत काम केले. १९९० नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्याच्या क्षेत्रात प्रॅक्टिस केली. याशिवाय, ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील म्हणूनही कार्यरत होते.
न्यायमूर्ती गवई यांची ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी ते सरकारी वकील बनले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आणि १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”