“बुलाती है मगर जाने का नही” फेम शायर हरपला : राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी आज सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे.
‘अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे
ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे’ असं इंदौरी म्हणाले होते.तसंच, ‘मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल’ असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं होतं.
परंतु, ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन दिवस उलटला नाही तेच राहत इंदोरी यांच्या निधनाची बातमी आली. कोरोनामुळे इंदौरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.