पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी टंचाई आढावा बैठक….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.25 :- पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता महसूल भवन येथे जिल्ह्याच्या पाणी टंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईची स्थिती, विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व संभाव्य उपाययोजनांची पालकमंत्री माहिती व आढावा घेणार आहे.