आज पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचे मार्गदर्शन : नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती ; पुसद अर्बन बँकेचा उपक्रम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यू.एन.वानखेडे
पुसद
नुकतेच केंद्रशासनाने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू न झाल्याने पालक व विद्यार्थी द्विधा मनस्थितीत आहे.गावपातळीपासून ते महानगरांमध्ये सारखीच परिस्थिती असल्याचे लक्षात आल्यानंतर अत्यंत महत्वाच्या या विषयावर सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन सुपर कॉम्प्युटर चे जनक , पदमभूषण ,नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती व पंतप्रधानांच्या सायंटिफिक ऍडव्हायजरी कमेटीचे
सदस्य डॉ विजय भटकर यांचे
नविन शैक्षणिक धोरण,कोविड १९मुळे पालक आणि विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती या विषयावर आज दुपारी ४.३०वाजता भव्य वेबिनार चे आयोजन केले आहे.तसेच अमरावती तथा नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ विलास भाले, डायलॉग इंडिया न्युज पेपर दिल्ली चे संपादक अनुज अग्रवाल,बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश वानखेडे तसेच उन्नत भारत अभियान च्या अमरावती विभागच्या एडवायजर डॉ अर्चना बारब्दे हे वेबिनार मध्ये पॅनलिस्ट म्हणून जुळणार आहेत.यापूर्वी २६ जुलै २०२०रोजी डॉ अविनाश गावंडे यांचा COVID -19 अद्यावत माहिती ,जवाबदाऱ्या व उपाय तसेच 2 ऑगस्ट रोजी मानसोपचारतज्ञ डॉ मिलिंद आपटे सायकॉलॉजिस्ट यांचा COVID मुळे सामान्य जनतेच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर बँकेतर्फे आयोजित वेबिनारला प्रचंड प्रतिसाद लाभला होता हे येथे उल्लेखनीय.
सदर व्हेबिनर झूम अँप सह शरद मैंद फेस बुक पेजवर दिसणार आहे.विद्यार्थी, पालक,शिक्षकांसह सर्वांसाठी उपयुक्त अश्या या वेबिनार चा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व संचालक मंडळ यांनी केले आहे.