छगन भुजबळ मालेगावात उलघडणार मनातील ‘पत्ता’; अमित शहांशी करणार चर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मालेगावमध्ये आपला पत्ता खोलण्याची शक्यता आहे. नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत. त्याचदम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा मालेगाव येथील सहकार परिषदेला जाणार आहेत.
याच कार्यक्रमाला भुजबळ सुद्धा जाणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
मालेगावला उद्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सहकार परिषद होणार आहे. या परिषदेला छगन भुजबळदेखील उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत अमित शहांशी चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. अनेकदा उघड नाराजी व्यक्त करूनही पक्षाकडून भुजबळांच्या नाराजीची दखल घेतली जात नसल्यानं भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.