त्याक्षणी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देईन”, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गद्दारांनी वार केले तरी उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेल. जेव्हा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की मी विचार सोडले, तेव्हाच मी पद सोडेल.
महाराष्ट्रातील लोक मला कुटुंब मानतात. कुटुंबातील सदस्य मानतात. तो महाराष्ट्र आणि मुंबईकर माझ्या जीवाला जीवच देईल, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणात ते बोलत होते.
अमित शाह किस झाड की पत्ती
“अमित शाह म्हणाले महाराष्ट्रातील विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारी आहे. वाघ काय असतो आणि पंजा काय असतो ते येत्या काळात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं. तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर घणाघात केला.
“ज्या क्षणी महाराष्ट्र हातून जाईल तेव्हा दिल्ली कोलमडेल”
“मुद्दाम सभा घेतली. किती लोक सोबत आहेत ते पाहायचे होते. अमित शाह माझी जागा ठरवू शकत नाही. माझ्या वडिलांनी दिलेली हे शिवसैनिक माझी संपत्ती आहे. गद्दारांनी वार केले तरी उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेल. जेव्हा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल विचार सोडेल, तेव्हाच मी पद सोडेल. महाराष्ट्रातील लोक मला कुटुंब मानतात. कुटुंबातील सदस्य मानतात. तो महाराष्ट्र आणि मुंबईकर माझ्या जीवाला जीवच देईन. निष्ठूर वागणार नाही. हारजीत होत असते. पराभव आम्हाला धक्का देणारा होता. तसा भाजपच्या लोकांना विजयाचा धक्का बसला. आपण जिंकलो कसे हेच त्यांना कळत नाही. अडीच वर्ष सर्व सत्ता वापरून अमित शाहने आपल्यावर घटनाबाह्य सरकार बसवलं. ते आपल्या हातातून महाराष्ट्र जाऊ देतील? ज्या क्षणी महाराष्ट्र हातून जाईल तेव्हा दिल्ली कोलमडेल हे त्यांना माहीत होतं. जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला निकाल लागला असता तर दिल्ली त्यांच्या हातून गेला असता”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“ही तुमची दगाबाजी, आमची नाही”
“मी त्यांचा समाचार घेत राहणार. मी नाही सोडणार. मिठी मारू तर प्रेमाने मारू. पाठित वार केला तर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची शिकवण आहे. शरद पवारांना २० फूट खड्ड्यात गाडल्याचं अमित शाह म्हणतात. पवारांनी १९७८ला जो काही पुलोदचा प्रयोग केला होता. तेव्हा जी काही दगाबाजी केली होती. त्या दगाबाजी सरकारमध्ये जनसंघ होता. हशू आडवाणी नावाचा इसम त्यावेळी पुलोदमध्ये मंत्री होता. श्यामाप्रसाद मुखर्जीपर्यंत जाता येईल. जनता पक्ष फोडण्यात जनसंघ आघाडीवर होता. ही दगाबाजी तुमची. आमची नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….