26 जानेवारीला राज्य सरकार मोठी घोषणा करणार, 21 नवीन जिल्हे होणार? महसूलमंत्र्यांनी केलं स्पष्ट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन 21 जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे.
तसेच 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात 21 नवीन जिल्हे तयार होणार का? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा (District Collector) वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपूरमध्ये (Nagpur) माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.
अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना 100 दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव 100 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….