पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सेनेत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला मोठे खिंडार पडले असून, तालुक्यातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला आहे. पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबईत हा पक्षाप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
यात सासवड शहरातील अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.
सासवडचे माजी उपनगराध्यक्ष दिपक टकले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शहाजी गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वृषाल उर्फ पप्पू भोंगळे, खरेदी विक्री संघाचे संचालक सागर जगताप, सासवड नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप जगताप, उद्योजक अतुल जगताप, राजू टकले, मयूर जगताप आणि सहकारी संस्थांचे ऑडिटर यशवंत पवार आदींचा यात समावेश आहे.
सासवड शहराच्या राजकारणात टकले कुटुंबीय हे एक मातब्बर कुटुंब मानले जाते. दिपक टकले हे अनेकदा नगरसेवक म्हणून इथे निवडून आलेले असून, राजकारणाच्या सुरवातीच्या काळात ते माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचे कट्टर समर्थक होते. शहाजी गायकवाड हेदेखील जाधवराव यांच्या तालमीत तयार झाले असून वीर भिवडी गटातून त्यांनी विजय मिळवला होता. संदीप जगताप, अतुल जगताप, यशवंत पवार आणि मयूर जगताप हे राष्ट्रवादी पक्षाचे समर्थक म्हणून ओळखले जात. परंतु या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सासवड शहराच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळू शकतात. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोंगळे, शहरप्रमुख मिलिंद इनामके, अविनाश बडदे, तेजस राऊत, राजू शिंदे, धनंजय म्हेत्रे, विवेक दाते, सुजित जगताप, मंगेश भिंताडे आदी उपस्थित होते.
तालुक्यासह सासवडचा विकास शिवसेनाच करू शकते: टकले
यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष दिपक टकले म्हणाले, पुरंदर तालुक्यात आणि सासवड शहरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजय शिवतारे अमुलाग्र बदल घडवतील. त्यांच्या या कार्यात आपलाही हातभार असावा या उद्देशाने केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात सासवडच्या राजकारणात याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….