बीड जिल्हा हादरला… जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू, सरपंच हत्येनंतर जिल्ह्यातील दुसरी मोठी घटना…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचारामुळे हादरला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर, गुरुवारी रात्री झालेल्या जमावाच्या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी आहे.
ही घटना जिल्ह्याच्या अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, यामुळे स्थानिक परिसरात भीतीचं वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि यामुळे निर्माण होणारे तणावाचे वातावरण यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवार रात्री 10 वाजताच्या सुमारास, अष्टी तालुक्यातील हाटोलन गावचे रहिवासी अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, आणि कृष्णा विलास भोसले हे तिघेही वहिरा गावात आले होते. स्थानिक गावातील आणि बाहेरील काही लोक या ठिकाणी जमले होते. सायंकाळपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर रात्री उशिरा वादाला सुरुवात झाली.
वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले आणि जमावाने लाकडी दांडके व धारदार शस्त्रांचा वापर करत या तिघांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात अजय आणि भरत भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा भोसले गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
पोलीस तपास आणि संशयितांना अटक
या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. पोलीस तपासादरम्यान, सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अजय आणि भरत भोसले यांच्या मृतदेहांना अष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
परिसरात भीतीचं वातावरण-
ही घटना घडल्यापासून वहिरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये तणावाचं वातावरण आहे. याआधीच मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेत होती. आता दोन भावांच्या हत्येमुळे स्थानिक लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक प्रशासन, आणि गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपशीलवार तपास करत आहेत. प्राथमिक तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नांत
बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे, याबाबत चर्चा सुरू केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….