हजरत उमर फारूक शाळेत सिरत-ऊन-नबी (स.अ) क्विज आयोजित…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक हजरत उमर फारुक शाळेमध्ये सिरत-ऊन-नबी (स.अ)क्विज आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद वकील सर, प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल वहाब मलक साहेब, सय्यद रेहान (इंजिनियर) आणि सर्व उर्दू शाळेचे मुख्याध्यापक लाभले होते.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना काही दिवसा अगोदर ‘दुर्रेयतीम’हे पुस्तक देण्यात आले होते आणि त्या पुस्तकाचे पूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्यावर परीक्षा घेण्यात आली त्या पेपर मध्ये एकूण 100 प्रश्न होते. त्यात 80 प्रश्न पर्यायवाचक होते आणि 20 प्रश्न लेखीवर, आधारित होते त्या पेपरची विभागणी चार ग्रुप मध्ये करण्यात आली होती व ते पेपर समूहामध्ये रम्य असे वातावरण घेण्यात आले होते .
या कार्यक्रमांमध्ये एकूण तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रथम बक्षीस 3000रू व सन्मान चिन्ह. द्वितीय बक्षीस 2000रू व सन्मान चिन्ह आणि तृतीय बक्षीस 1000रु व सन्मान चिन्ह ठेवण्यात आली.तर प्रथम क्रमांक फरीसा खानम मो. शम्स नवेद खान या विद्यार्थिनीला मिळाला,द्वितीय क्रमांक तमन्ना फिरदोस साबीर खान या विद्यार्थिनीला मिळाला तर तृतीय क्रमांक आजरीम शाफिया आसिफ खान या विद्यार्थिनीला मिळाला तर वर्गात प्रथम विद्यार्थीमध्ये शेख फराज,शेख फरहान,मसीरा फिरदोस ,आदिना अनम ,शेख ज़ियान,अम्मारा उरूज ,नौशीन खानम, शेख वजाहत, आयतुल्लाह शेख ,सादिया खानम ,सय्यद रेहान हे विद्यार्थी होते आणि सर्व परीक्षेला हजर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाचा उद्देश निष्कर्ष यशाच्या पायरीवर चालत गेला असा दिसून येते, याचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर (माध्य)याह्या सर (प्राथ)आणि शिक्षक वृंद यांना जातो.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….