सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी मुंबईच्या दिशेने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला आहे. आज लॉन्ग मार्चचा दुसरा दिवस आहे. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झालं होतं. या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी तसच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबांच शासनाने पूर्नवसन करावं. त्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी. निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी लॉन्ग मार्च काढला आहे. आज या लाँग मार्चचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सायंकाळी परभणीतून या लाँग मार्चला सुरुवात झाली. काल कुंभकर्ण टाकळी येथे पहिला मुक्काम जिल्हा परिषद शाळेत होता.
आज दुसऱ्यादिवशी काही वेळात लॉन्ग मार्च जिंतूर तालुक्यातील बोरी कडे रवाना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायी मार्चमध्ये सहभागी झालेत. त्यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. रस्त्यामध्ये लॉन्ग मार्चमध्ये अनेक अनुयायी सहभागी होत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची प्रमुख मागणीसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे.
…म्हणून लॉन्ग मार्चचा निर्णय
कुंभकर्ण टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेतच लाँग मार्चमध्ये सहभागी असलेल्या अनुयायांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था स्थानिकांकडून केली जात आहे. काही वेळात मार्च जिंतूर तालुक्यातील बोरीकडे निघणार आहे. या लॉन्ग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने महिला, युवक, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मागच्या 33 दिवसांपासून परभणीत आंदोलन सुरु होतं. पण शासनाकडून मागण्यांची दखल घेतली गेली नाही. म्हणून आंदोलकांनी अखेर परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत सुपूर्द करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबियांना भेटले. पण जो पर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत मदत स्वीकारण्यास कुटुंबाने नकार दिला आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….