कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावं चर्चेत..! नाना पटोलेंचा पत्ता कट होणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यानंतर नाना पटोले हे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. त्यांनी सर्व पराभावाची जबाबदारी स्विकारत पदाचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती.
मात्र वरिष्ठ नेत्यांनी त्यांना यासाठी थांबवलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष नेमले जाईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसने १०० पेक्षा अधिक जागा लढवल्या, मात्र त्यात त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आलेत. यानंतर नाना पटोले यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी त्यांना या पदावर कायम ठेवले. यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्याआधी कॉंग्रेस पक्षात मोठे बदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातला निवडला जाणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला मोठी पसंती दिल्याची माहिती आहे. परंतु पक्षातील तरूण चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी द्यावी, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. त्यांनी यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं, असे म्हटले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….