धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर! मनोज जरांगे गावात दाखल, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “धनंजय मुंडेंचा निकवटर्तीय वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावं, यासह विविध मागण्यासाठी मस्साजोगचे गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहेत.
गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील गावात दाखल झाले आहेत.
गावात दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला आणि टाकीवरुन खाली येण्याचं विनवणी केली. ”तुम्ही खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खाली या, माझी विनंती आहे. तुम्हाला काय झालं तर त्यांचं जगणं अवघड करेन.” असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगमध्ये गावकरी मोठ्या संख्येने टॉवर परिसरामध्ये दाखल झाले आहेत. एक महिना लोटला तरी या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. मुख्य सुत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल नाही. कराडवर खुनासह मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
यासह या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी, हीदेखील मागणी आहे. सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. आठवड्याभरापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना फोन लावला होता. त्यांनी दोन दिवसांत कळवतो असं सांगितलं होतं. परंतु अजूनही त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, अंबादास दानवे, संभाजीराजे छत्रपती, संदीप क्षीरसागर यांनी मागितला आहे. त्यासाठी या नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती. परंतु सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. उलट अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत असल्याचं दिसत आहे. त्यांचं नाव या प्रकरणात कुठेच नाही, असं पवार म्हणत आहे. परंतु सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे मुंडेंचा सरकारी बंगला सातपुडा येथेच आवादा कंपनीच्या खंडणीची डील झाली. तरीही मुंडेंच्या बाबतीत सरकार कारवाई करत नसल्याचं दिसतंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….