म्हणून उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस सोबत येऊ शकतात; दिले हे 5 संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यामध्ये मोठ्या बहुमताने भाजपप्रणीत महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र २०१९ मध्ये राज्यात मोठमोठे भूकंप झाले होते. आधी पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग झाला तद्नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली.
त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, हे आता सर्वांनाच वाटू लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्रित येऊ शकतात, असं बोललं जातंय. त्याचं कारण सरकार स्थापन झाल्यापासून घडलेल्या काही घडामोडी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. शिवाय ठाकरे गटातील नेत्यांची मवाळ झालेली भाषा नेमकं काय सांगतेय, हे पाहूया.
ठाकरे-फडणवीसांकडून मिळालेले पाच संकेत
१. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवर आगपाखड करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. १७ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात फडणवीसांच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली.
२. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी २० डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पुढे ९ जानेवारी रोजी आदित्य पुन्हा फडणवीसांच्या भेटीला गेले. या दोन्ही भेटी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झाल्या होत्या.
३. दि. ३ जानेवारी रोजी शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं. गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य मुख्यमंत्री आणत असतील तर त्यांचं कौतुकच आहे, अशा शब्दांमध्ये भलामण करण्यात आलेली होती.
४. ‘सामना’तील कौतुकानंतर फडणवीसांनी आभारही मानले होते. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते, ते शत्रू नाहीत.. असं म्हटलं होतं. राऊतांनीही या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हटलं.
५. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटं भाजपही अपेक्षित यश मिळवू शकत नाही. त्यामुळे ठाकरे-भाजप एकत्रितपणे या निवडणुका लढवू शकतात. नाहीतरी या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
एकनाथ शिंदेंची गुपचिळी कशामुळे?
सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आढेवेढे घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कमालीचे शांत आहेत. त्यांना अपेक्षित मंत्रिपदं मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचं स्पष्ट आहे. शपथविधीच्या तासभर अगोदरपर्यंत त्यांचा निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय. शिंदेंना वेळीच दाबण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. केंद्र सरकारमध्ये काही खालीवर झालं तर ठाकरेंचे खासदार सरकारला टेकू देऊ शकतात, हाही त्यामागचा एक विचार असू शकतो.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….