दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काँग्रेसने आज त्यांच्या तिसऱ्या गॅरंटीची घोषणा केली. ही घोषणा तरुणांसाठी असून तिचे नाव ‘युवा उडान योजना’, असे आहे. आपले सरकार आल्यास, आपण बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी दर महिन्याला प्रशिक्षणार्थी म्हणून ८५०० रुपये मदत म्हणून देऊ, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे.
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली.
तत्पूर्वी, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी शनिवारीच सोशल मीडियाद्वारे, सचिन पायलट दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात एक मोठी घोषणा करणार आहेत, अशी माहिती दिली होती. काँग्रेसने सर्वात पहिले महिलांसाठी सन्मान निधीची घोषणा केली होती. यात, सरकार स्थापन झाल्यानंतर, ‘प्यारी दीदी योजने’अंतर्गत महिलांना दरमहा ₹ २५०० देण्याची घोषणा करण्यात आली होती. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती.
मोफत उपचारांची गॅरंटी –
काँग्रेसच्या दुसऱ्या गॅरंटीमध्ये मोफत उपचारांचा समावेश होता. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत ही घोषणा केली. या हमीला जीवन रक्षा योजना, असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत, सर्व नागरिकांना २५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, आमची ‘मनिषा’ दिल्लीतील लोकांची ‘सुरक्षा’, असेही काँग्रेसने म्हटले होते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!