आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक धडे…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या उदात्त हेतूने शिक्षकांनी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यावहारिक ज्ञान घेऊन आपला आनंद उत्सव साजरा केला.
शनिवारला हाजी रफीक अहेमद लोहार न. प उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ नेहरू वार्ड लोहार लाईन पुसद येथे 11/01/2025 रोजी बालकांचा ‘आनंद महोत्सव मेळावा’ साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. सदर कार्यक्रमात वार्डातील पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते व शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली. तसेच नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.धिरज आडे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न.प-२ चे केंद्रप्रमुख श्री۔देवानंद मोहिते सर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.फारुक अहेमद तेली,न.प हिंदी शाळा क्रं १ मुख्याध्यापक (नफा.मानपा राज्य अध्यक्ष) श्री.सुनिल जाधव सर,न.प /जि.प उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री.मतीन सर,न.प उर्दू शाळा क्रं १ चे मुख्याध्यापक श्री.मो.मुजाहिद सर, न.प उर्दू शाळा क्रं ३ कडून स.शिक्षक अ.हमीद सर , अक्रम सर ,निसार अहेमद लोहार भाई,मोईन भाई, शेकरू भाई, जमील भाई,अ.रशिद भाई,मो.फारूक तेली , एजाज भाई टेलर ,शकील भाई, इम्रान भाई,सफूरा खाला, सलमा बाजी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्द्घाटन प्रशासन अधिकारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन खान सादिक सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री मो.शारिक, सहाय्यक शिक्षक श्री.खान सादिक, बालवाडी शिक्षिका वहिदा रहेमान बाजी, मदतनीस मुस्कान सदफ, स्वयंपाकी ताहेरा बाजी अथक परिश्रम घेतले.

आनंद मेळाव्याच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेत खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागलेले पैसे व बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारी कसब आणि नफा या व्यावहारिक ज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून घेतली. मिळालेल्या नफ्यातून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चित्ताचे वातावरण पाहायला मिळाले शेवटी सर्व विद्यार्थी व न.प पुसद अंतर्गत सर्व शिक्षकांनी एकत्रित येत या आनंद मेळाव्याचा उत्साहात जल्लोष केला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!