पवार काका-पुतणे एकाच व्यासपीठावर दिसणार..! अनेक मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते जमणार एकाच व्यासपीठावर, दोन्ही पवारांकडे राज्याचं लक्ष…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत एकाच मंचावरती येणार असल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
आमदार रोहित पवार यांची सोशल मीडियावरती यासंबंधीची माहिती पोस्ट केली आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर येणार आहेत. नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) बारामतीत पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत, त्यामुळे सध्या हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने दरवर्षी कृषी प्रदर्शनाचा आयोजन केलं जातं. शरद पवार या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकाच मंचावर येणार आहेत. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित बारामती कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित दहाव्या कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (दि. 15) एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यांच्यासोबत अन्य काही नेते, मंत्री देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे प्रथमच बारामतीत एका व्यासपीठावर येत आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्रावर कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 20 जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन 15 रोजी होणार आहे. या समारंभाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार आदी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे एकाच व्यासपीठावर येत असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचे कामकाज राजेंद्र पवार हे पाहतात.
“साहेबांच्यानंतर बारामती अजितदादाच्या मागे”
‘माझ्या भावाला मी निरोप पाठवला होता, माझ्याविरोधात मुलाला उभा करु नकोस, पण त्यांना वाटलं साहेबांच्या मागे बारामती आहे. पण त्यांना काय माहीत साहेबांच्यानंतर बारामती अजित पवारांच्या मागे आहे, असा टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे. तसंच आपल्या बंधुंनी मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं, माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48 हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला, अरे नको माझ्याविरोधात तुझ्या पोराला उभं करू, अरे नाय, बारामती साहेबांच्या मागं आहे, असं मला सांगितलं. मी म्हटलं, आहे की, मी कुठे नाही म्हणतोय. पण, साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती दादांच्या मागे आहे. म्हणून मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपला गप्प बसलो. सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होतं,’ असं अजित पवारांन म्हटलं आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!