एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण..? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूरमध्ये शुक्रवारी (१० जानेवारी) सायंकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिलं. यावेळी त्यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? नरेंद्र मोदी की अमित शाह यांच्यापैकी एका नेत्याची निवड करण्यास सांगितंल. त्यावरही त्यांनी त्यांची मतं मांडली. महायुतीचे विरोधक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (आरएसएस) कौतुक केलं होतं. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. “विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं”.असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. पवारांनी संघाचं कौतुक केल्यावर संघ-भाजपाची शरद पवार व त्यांच्या पक्षाशी जवळीक वाढतेय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की भाजपा व शरद पवारांची जवळीक वाढतेय का? त्यावर ते म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. तसं काही झालंच पाहिजे असं नाही. मात्र उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, मग राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावं असं नाही, परंतु ते होणं फार चांगलं आहे असं मला वाटत नाही. ते व्हावं या मताचा मी नाही. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा भरवसा नाही”.
राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
मुलाखतीच्या रॅपीड फायर फेरीत देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “राजकारणात काहीही पक्कं नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे हे काही शत्रू नाहीत.”
शिंदे की पवार अधिक विश्वासू सहकारी कोण?
दरम्यान, यावेळी फडणवीसांना विचारण्यात आलं की खूप मनापासून विश्वास टाकावा असा सहकारी कोण? एकनाथ शिंदे की अजित पवार? यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही माझ्यापुरतं विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!