आनंद मेळाव्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक धडे…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शालेय शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या उदात्त हेतूने शिक्षकांनी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन व्यावहारिक ज्ञान घेऊन आपला आनंद उत्सव साजरा केला.
शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पारवा (बु) येथे 04/01/2025 रोजी बालकांचा ‘आनंद महोत्सव मेळावा’ साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. सदर कार्यक्रमात गावातील पालकवर्ग, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील पोलीस पाटील, यांची उपस्थिती लाभली. तसेच पारवा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गजानन होंडे सर व पोलीस पाटील श्री अविनाश पवार यांचे हस्ते उद्द्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रामप्रसाद पाचपुते, उपसरपंच श्री हिरामण खोकले, शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद गिरी, सहाय्यक शिक्षक श्री.अर्जुन राठोड, निलेश भेंडेकर, सतिश किर्तनकार तसेच युवा प्रशिक्षणार्थी कु.वैष्णवी जाधव व शाळेचे स्वयंपाकी श्री.माधव गोविंदा शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.
आनंद मेळाव्याच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेत खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागलेले पैसे व बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारी कसब आणि नफा या व्यावहारिक ज्ञानाबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून घेतली. मिळालेल्या नफ्यातून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चित्ताचे वातावरण पाहायला मिळाले शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित येत या आनंद मेळाव्याचा उत्साहात जल्लोष केला.