शरद पवारांच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “धनंजय मुंडे पुरुष वेश्या…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून होत आहे. पण, पुरावा नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आहे.
मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार उत्तमराव जानकर यांची जीभ घसरली आहे.
धनंजय मुंडे हे पुरुष वेश्या असलेले मंत्री आहेत. असे मंत्री सरकार चालवत असतील, तर राज्यानं काय घ्यायचं? असा सवाल उत्तमराव जानकर यांनी उपस्थित केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
उत्तमराव जानकर म्हणाले, “धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. राजीनामा मागण्याची गरज काय आहे? हे राज्य अगदी नैतिक होते. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांनीही राजीनामे दिले आहेत. धनंजय मुंडेंनी रानबाजार मांडला आहे. स्त्री वेश्या पाहिल्या आहेत. पण, पुरुष वेश्या असू शकतो, हे अशा पद्धतीचे मंत्री ( धनंजय मुंडे ) आहेत. हे मंत्री सरकार चालवत असतील, तर या राज्यानं घ्यायचं काय?”
“गृहखाते जागे आणि शुद्धीवर असते तर वाल्या कोळी तयारच झाला नसता. गृहमंत्री आणि सरकारच्या आशीर्वादानं राज्यात गुंडगिरी सुरू आहे. सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊन तो पोलिसांना शरण गेला आहे. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे,” असा आरोप जानकर यांनी केली आहे.
“निवडणूक आयोग कार्यालयात बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचं सांगत आहे. पण, तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घाटोळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो. स्वायत्त संस्था ज्या पद्धतीनं काम करत आहेत, हे देशाला घातक आहे. सरकार ज्या पद्धतीनं या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर आहे. निवडणूक आयोग हा भाजपसाठी ‘वाल्या’ म्हणूनच काम करत आहे,” अशी टीकाही जानकर यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….