छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा भ्याड हल्ला, ८ जवान शहीद, चालकही मृत्यूमुखी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बिजापूर :- “छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी (दि.६) दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले.
नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले आणि स्फोट झाला. या IED स्फोटात भारतीय लष्कराचे ९ जवान शहीद झाले आहेत. तर ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिल्याचे वृत्त दिले आहे.
सोमवारी (दि.६) दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये ८ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….