बीडच्या घटनेवरून राजकारण नको, मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाई; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीडमध्ये सरपंचांची झालेली हत्या हा गंभीर प्रकारच आहे. मात्र या घटनेवरून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. या प्रकरणातून राजकारणाऐवजी समाजात सुधार व्हावा यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.
चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपुरात ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कुठल्याही मुद्द्यावरून सार्वजनिक ठिकाणी मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पुर्ण क्षमतेने कारवाई करत आहेत. या प्रकरणात कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न झालेला नाही. जर कुणी तसा प्रकार केला तरी कुणालाही वाचवू देणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. जे दादागिरी करतात किंवा दहशत निर्माण करून जनतेत जरब बसविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर वचक बसविण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांची योग्य कारवाई सुरू आहे. अंजली दमानिया यांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे करावी. त्यावर योग्य पावले उचलली जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.
आरोपी कुठेही गेले असतील व कुणीही मदत केली असेल तर कारवाई होत आहे. या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही व काही जण चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी होऊ द्यावी. चौकशी पूर्ण झाल्यावर कुठल्याही दोषीला सोडणार नाही हा आमचा शब्द आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….