नांदेड बॉम्बस्फोट प्रकरण ; १७ वर्षांनी लागला निकाल, 10 आरोपींची निर्दोष मुक्तता….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “नांदेड मध्ये २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज नांदेड न्यायालयाने दिला आहे. हा खटला 17 वर्ष नांदेड न्यायालयात सुरू होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.
नांदेड बॉम्ब स्फोट प्रकरणाचा आज निकाल लागला. या प्रकरणातील 10 आरोपींची नांदेड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाचा खटला तब्बल 17 वर्ष नांदेड न्यायालयात सुरू होता. 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. 6 एप्रिल 2007 मध्ये नांदेड शहरातील पाटबंधारे नगरमधील नरेश राजकोंडवार याच्या घरी बॉम्बब्लास्ट झाला होता. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्या हादरला होता. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर चार जण जखमी झाले होते. नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानशे अशी या घटनेतील मृत व्यक्तींची नावं आहे.
सदर घटना घडल्यानंतर प्रकरणातील आरोपी असलेला राहुल पांडे आणि त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या आरोपींना फरार करण्यात डॉ. उमेश देशपांडे आणि वकील मिलिंद एकताटे यांच्यासह इतरांनी मदत केली असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण दहा आरोपी तेव्हा सिद्ध झाले होते.
विशेष म्हणजे या प्रकरणानंतर हिंदू दहशदवाद असे देखील म्हणून राज्यभर गाजले होते.मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपींचा देखील यात सहभाग असल्याचे त्यावेळी पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. हे प्रकरण नांदेड पोलीस, एटीएस आणि सीबीआयकडे वर्ग होते. हे दहा आरोपी जामिनावर बाहेर होते. या प्रकरणाचा खटला तब्बल 17 वर्ष नांदेड न्यायालयात सुरू होता. 17 वर्षानंतर आज या प्रकरणाचा निकाल लागला असून नांदेड न्यायालयाने या प्रकरणातील दहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.