लष्कराच्या वाहनाला अपघात, पाच जवानांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जम्मू काश्मीर :- “जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती येतेय. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लष्काराच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे, पुंछ भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सेनेचं वाहन दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचं एक वाहन तब्बल ३०० फूट खोल दरीमध्ये कोसळलं. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलिस आणि लष्करी जवान अपघात स्थळी दाखल झाले.
नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टाकडे निघालेल्या ११ एमएलआयच्या एका वाहनाला मंगळवारी हा अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी ही भीषण घटना घडली. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर लष्काराची गाडी ३०० फूट खोल दरीमध्ये कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातामध्ये पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरु आहे. जखमी सैनिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मृत जवानांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….